UPSC 2024 परीक्षेत यश: कु. प्रियांका मोहिते यांचा स्वराज्य संघटनेतर्फे सत्कार.



उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर आपल्या विभागातील आंबेडकरी विचारसरणीच्या कु. प्रियांका सुरेश मोहिते यांनी UPSC 2024 परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत महाराष्ट्र कॅडरमध्ये IPS पदावर निवड होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्वराज्य संघटनेच्यावतीने २ जून २०२५ रोजी त्यांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी IPS प्रियांका मोहिते यांना गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” हे पुस्तक, शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना IPS प्रियांका मोहिते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून प्रियांका मोहिते यांचे कौतुक करत सांगितले की, “IPS प्रियांका मोहिते या बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या खऱ्या अनुयायीं असून, समाजातील इतर तरुणांनी त्यांच्यासारखा आदर्श घेऊन शासनकर्ती जमात होण्यासाठी पुढे यावे.”