Breaking NewsheadlineHeadline TodaypoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News

प्रभाग क्रमांक 18 च्या विकास कामाचे लवकरच होणार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते उद्घाटन.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


उल्हासनगर नंबर चार प्रभाग क्रमांक 18(ब) विभागात तब्बल एक करोड 20 लाख रुपयांचा निधी वापरुन विविध प्रकारच्या विकास काम जवळपास पुर्ण झाले असुन लवकरच सदर विकास कामाचे उग्दाटन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उल्हासनगर महानगरपालिकचे माजी नगरसेवक तथा सभापती प्रमोद टाले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.


प्रभाग क्रमांक 18(ब), उल्हासनगर नंबर चार सुभाष टेकडी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,व आजुबाजुच्या परीसरात बहुतांश बहुजन समाज वास्तव्यास असुन सदर परीसरातील महात्मा फुले काँलनी,रामजी आंबेडकर नगर,नागसेन नगर आदि विभागातील तिन समाजमंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.आणी त्याच बरोबर नागसेन नगर परिसरातील रोड,भरत नगर परीसरातील नाल्यालगत संरक्षण भिंत उभारणे,सुभाष टेकडी,अशोकवन विभागातील मोठा नाला,अशोक वन,डी.पी.च्या शेजारील मुतारीचे सुशोभीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असुन हया सर्व विकासकामाचे उग्घाटन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी सभापती प्रमोद टाले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उल्हासनगर नंबर चार,प्रभाग क्रमांक18(ब) मधील बहुतांश विकास कामे पुर्णत्वास झाले असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.






Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

One Comment

  1. Mahtama phule colony, goti karkhana ithun Khali area madhe janyasathi jya payrya aahet tithe pn kam karnyat yave ashi me request karte ani tithech asnare 2 dukan aahet ek photo ch aahe Ani dusra bhangar ch aahe tya dukan valyani tyancha parisar ani rastavarahi tyanch saman taklele aahe jyamule tya areacha entrance bghun area kharab aahe asa janavat pn khartar tas nahiye. Tya 2 dukananmule area var parinam hoto. Me request karte ki ya goshtivarahi laksh dyave.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights